Sunday, 2 July 2017

संपूर्ण आरोग्य

प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.

🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.

🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.

🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.

🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.

🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

 🎾पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो

🎾‬चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर 

कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.

2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो. 

3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.

४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते. 

५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो. 

६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.

७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते. 

८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो. 

९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात. 

१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही. 

११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.

१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो. 

१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो. 
▪नोट :-▪
 मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये – 
१) आवळा २) चिकु ३) भेंडी 
४) पालक ५) गोबी ६) काकडी 
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा 
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे. 
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन  व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट 
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के  ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी  गुलाबी  नसावीत,पण हिरवी, 
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
 वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने 
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
 ☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
 सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
 ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
 शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही 
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
 तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी 
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे,  गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान 
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
 यांनी पाठवले आहे..!!!
🌴  आरोग्य वार्ता🌴

 "पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने   रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!

आजीबाईचा बटवा

आजीबाईचा बटवा 
संपूर्ण आरोग्य

    कापराचे अनेक उपयोग

    १) जर डासांचा त्रास होत असेल तर विस्तवावर थोडा कापुर टाकावा त्यामुळे डास नाहीसे होतील.
    २) कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापुर विरघळून थोडेसे कोमट करून कानात टाकावा.
    ३ ) उलटी होत असेल तर पुदिन्याच्या अर्कात थोडासा कापुर मिसळून कही थेंब प्यावेत.
    ४) केसात कोंडा झाला असेल तर आवळ्याच्या तेलात कापुर मिसळून डोक्याला लावावा.
    ५) कापाराच्या वड्या किचनमध्ये ठेवल्या तर माश्या होत नाहीत.
    ६) पडसे झाल्यास पांढऱ्या रुमालात कापुर बांधून घ्यावा.
    ७) तोंड आले असल्यास व तोंडात व्रण  पडले असल्यास तोंडात कापुर घोळवावे.
    ८) पोटात दुखत असल्यास जायफळ व हळदी सोबत थोडासा कापुर वाटून कोमट पाण्याबरोबर घ्यावा.
    ९) डोके दुखत असल्यास लिंबाच्या रसात कापुर मिसळून त्याचा कपाळावर लेप लावावा.
   १०) काजळामध्ये थोडासा कापुर मिसळून लावल्यास अनेक विकार नाहीसे होतात.

   आहारातील हानिकारक मिश्रण 

  खाली दिलेले पदार्थ एकत्र सेवन केल्याने  त्यांचे गुण कितीही चांगले असले तरी मिश्रणाने त्यांचे हानिकारक परिणाम होऊ शकतात.
   १) मध + तुप समान मात्रे मध्ये
   २) मध + दही किंवा ताक
   ३) मध + मुळा
   ४) खिचडी + मध
   ५) खरबूज + मध
   ६) आंबट पदार्थ + मध.
   ७) लोणचे + दही 
   ८) केळे + दही
   ९) एकत्र तेल व तुप
   १०) पाण्यासह तेल किंवा तुप

 खाजेवर काही घरगुती उपाय 

     १) खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून लावावा.
    २) तिळाचे तेल व चुण्याची  निवळी स्नानापूर्वी लावावी.
    ३) निंब पत्र दह्यामध्ये वाटून लावावे.
    ४) निंबू रसामध्ये तुळशीची पाने वाटून लेप लावावा.
    ५) गंधक पिटकरी व बोरीक अॅसिड सम प्रमाणात खोबरेल तेलामध्ये वाटून त्याने मालीश करावी.
    ६) खाज येत असेल तर खोबरेल तेलात कापुर मिसळून त्या तेलाने मसाज करावा.
    ७) खाज खुजली, फोड व त्वचेच्या कुठल्याही व्याधीवर मध व तितकीच दालचीनीची पावडर एकत्र केलेली पेस्ट लावल्यास थोड्याच दिवसात त्वचा स्वच्छ होते.

 पोटांवर गुणकारी स्वादिष्ठ पाचन चूर्ण 

सामग्री :- लिंबाचे सत्व १५ ग्रॅम, द्राक्षाचे दाणे ४० ग्रॅम, सुंठ ४० ग्रॅम, मिरे, पिंपळी, छोटी इलायची, दालचीनी, तेजपत्र, पुदिन्याची पाने २०/२० ग्रॅम भरडलेले जिरे १२० ग्रॅम, धने ८० ग्रॅम, सैंधव मीठ १०० ग्रॅम.
तयार करण्याची कृती :-लिंबाचे सत्व अर्धा चमचा पाण्यामध्ये मिसळा. सैंधव मीठ सोडून इतर सर्व द्रव्ये कुठून बारीक करा व त्याचे चूर्ण तयार करा. त्यानंतर वरील मिश्रणात टाका व हालवून एकत्रित करा. सेंदरी सैंधव मीठ कुठून त्यात मिसळा. वरील सर्व मिश्रण खुप वेळा ढवळा जेणेकरून सर्व घटक एकरूप होतील.
प्रमाण व सेवन विधी :- एक चमचा चूर्ण दिवसातून २-३ वेळा पाण्यातून घ्या. अथवा तशीच त्याची फक्की मारा. या चुर्णाच्या सेवनाने पचन शक्ती सुधारते. आणि जठराग्नी प्रबळ होतो. भूक चांगली लागते. अग्निमांध ( भूक न लागणे ) अपचन, अरुची आणि गैसेस इत्यादी व्याधीवर गुणकारी.
सौचास अवरोध होत असल्यास
१) रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा गरम पाण्यातून घ्यावे.
२) रात्री झोपताना एक चमचा एरंडेल तेल घ्यावे.
३) सकाळी उठल्यावर शेंगदाणे खावून वर भरपूर कोमट पाणी घ्यावे.
४) आहारात फायब्रस पदार्थांचा, पालेभाज्यांचा भरपूर समावेश करावा.
५) रात्री झोपताना दोन ते तीन अंजीर खावेत.
६) एक चमचा तुपात हिंग मिसळून घेतल्यास पोट दुखणे थांबते.
७) गॅसचा त्रास होत असेल तर लसणाच्या दोन पाकळ्या सोलून दोन चमचे शुद्ध तुपाबरोबर घ्या लगेचच आराम मिळेल.
८) बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर ओवा भाजलेल्या जि-याची पूड हिंग व काळे मीठ घातलेले दही गॅस व पोटदुखी       इ. वर लाभदायक आहे.
९) दह्यामुळे पोट साफ होऊन भुकही लागते.
१०) हिवाळ्यात गुळ व काळे मिरे घालून दह्याचे सेवन केल्यास भूक लागत नाही.

 दही

१) दररोज एक वाटी ताजे दही खाल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते. व सर्व रोगापासून बचाव होतो.
२) दह्या मुळे शरीराची अंतर्गत उष्णता कमी होते.तसेच मस्तक शांत राहते.
३) ताकाच्या रुपात दही अन्नपचनास मदत करते.
४) दही आरोग्यास जितके आवश्यक आहे तितकेच ते सौंदर्यासाठी ही उपयुक्त आहे.
५) एक ग्लास ताक घेऊन त्यात मुलतानी माती घाला, या मिश्रणाने केस धुतल्यास केस निरोगी, दाट  होतात.
६) केसात कोंडा झालेला असेल तर एक कप दही घेऊन त्याने केसाला हलके हलके मालीश करा. आठवड्यातून  दोन ते तीन वेळा हा उपचार केला तर कोंडा नाहीसा होईल. व केस मुलायम होतील.
७) दह्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. दही व विनेगार यांचे मिश्रण पायांच्या कोरडया त्वचेला लावा. मृत त्वचा निघून जाईल.  मिश्रण फ्रिज मध्ये ठेवूनही वापरता येते.
८) ताजे दही सकाळी किंवा दुपारी खाल्ल्यास कफाचा नाश होतो. आंबट दह्यात साखर घालून खाल्ल्यास कफ  होतो.  
अपचन :-दोन चमचे मध व त्यावर थोडी दालचीनी पावडर टाकून जेवणाचे आधी घेतल्यास अॅसिडिटी म्हणजे                 आम्लपित्तामुळे होणारी छातीची जळजळ थांबते व पाहीजे तेवढे जेवण पचवता येते.
धातु वृद्धि साठी - पांढऱ्या कांद्याचा रस अर्धा तोळा व मध अर्धा तोळा एकत्र करून सकाळ संध्याकाळ घ्यावा.
बदामाचा चुरा टाकलेल्या दुधात तुप आणि साखर टाकून ते प्यायल्याने वीर्यवृद्धी होते.
अभ्यंग  : अभ्यंग म्हणजे मालिश सर्व शरीराला चांगल्या प्रकारे अभ्यंग व्हावे यासाठी प्रत्येक भागाला २ ते ५ मिनिटे अभ्यंग करावे. जर एकाच भागाला अभ्यंग करावयाचे असेल तर कमीतकमी १५ मिनिटे अवश्य केला पाहीजे.निरोगी व्यक्तीसाठी दररोज स्नानापूर्वी ५ मिनिटाचा अवधी आहे. रोगावस्थेत यापेक्षा अधिक अपेक्षित आहे. अभ्यंगा नंतर १५ मिनिटे विश्रांती घ्यावी.
रातांधळेपणा :- जीरे, आवळा व कापसाची पाने सम घेवून वाटून डोळ्यांवर २१ दिवस पट्टी बांधल्याने रातांधळेपणात फायदा होतो.

मेदमस्त लठ्ठपणावर स्वस्त उपाय

१) आहारात केवळ सफरचंदाचेच सेवन केल्याने फायदा होतो.
२) टाकळीच्या पानांचा २० ते ५० मिली रस दिवसातून तीन वेळा प्याल्याने लठ्ठपणा दूर होतो.
३) चंद्रप्रभावटीच्या २-२ गोळ्या दररोज दोन वेळा घेतल्याने 'डनलप' सारखे शरीर ही सडपातळ होते.
४) आरोग्यवर्धिनी वटीच्या ३-३ गोळ्या दोन वेळा घेतल्याने व रात्री २ ते ५ ग्रॅम त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने ही  लठ्ठपणा कमी होतो.
५) एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस, दहा थेंब आल्याचा रस व दहा ग्रॅम मध घालून रोज सकाळी  नियमितपणे प्यायल्याने वजनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
६) रात्री झोपताना व सकाळी अनशेपोटी दालचीनीचा कपभर काढा मध टाकून घेतल्यास शरीरातील मेद कमी होतो व जेवणामुळे तो वाढू देत नाही.
७) वजन कमी करण्यासाठी काळा चहा फायदेशीर ठरतो. हृदयविकारावर ही काळा चहा वापरतात.
८) एक ग्लास दुधात मध मिसळून रोज रात्री प्यायल्याने दुबळेपणा निघून जातो व शरीर सुडौल, धष्टपुष्ट व सुदृढ बनते.
९) आल्याचा रस आणि मध एक प्रमाणात घेवून चाटन्याने, श्वास घेण्यास होणारा त्रास कमी होतो व उचक्या बंद होतात. 
सांधेदुखीसाठी :- १) रोज सकाळ व संध्याकाळ १ ते २ ग्रॅम मेथीचे दाणे पाण्याबरोबर गिळल्याने गुडघे व शरीराचे सांधे मजबूत होतात. वातविकार होत नाही. डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब, निम्न रक्तदाब होत नाही. शरीर स्वस्थ राहते. व स्थूलता वाढत नाही. ( लठ्ठपणा येत नाही )
२) कमी प्रमाणात मध व दालचीनी पावडर नियमित घेतल्यास ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात ही शक्ती कमी न पडता स्फूर्ती मिळते व थकवा वाटत नाही.
३) सांध्यावरील झिज लवकर भरून निघते त्यासाठी सांधे दुखीच्या रुग्णांनी बिटचे  सेवन करावे.
४) मोहरीचे तेल व कांद्याचा रस यांच्या मिश्रणाने सांध्या वर मालीश करा. 
वातविकारात :-वातामुळे हातापायामध्ये होणाऱ्या वेदनेसाठी मेथी तुपावर परतून त्याचे पीठ तयार करावे नंतर त्याचे लाडू बनवून रोज एक लाडू खावा. आठ-दहा दिवसातच हात व पायाच्या वेदनेत लाभ होईल.

अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी 

सब्जा घातलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. आठवडयातून२/३ वेला पालकाची भाजी खावी. आठवड्यातून एकदा तरी रेचक घ्यावे. भरपूर ताक प्यावे.
 चमेलीची पाने चावली तर तोंडा तील जखमा बऱ्या होतात.

पांढरे केस काळे होण्यासाठी 

१) नियमित पणे तिळाचे तेल केसांना लावावे.
२) आवळा रस जेष्ठमध पुड केसांच्या मुळाना लावावी.
३) मोहरीचे तेल केसांना दररोज लावावे. 
४) रोज दहा काळ्या मनुका खाव्यात.
५) मेंदी व तिळ एकत्र खलून लावावी.
६) तेलानी नियमित मालीश करावी व स्वच्छता राखावी.
७) काळे तीळ व खोबरे रोज चावून खाल्यास केस काळे होतात. व चांगले लांब वाढतात.
८) चाफा, चमेली, जुईची फुले खोबऱ्याच्या तेलात घालून उकाळा गार झाल्यानंतर या सुवासिक तेलाने शरीराला मालीश केल्यास स्फूर्ती येते. डोक्याला मालीश केल्यास केस मउ शार होतात.

निवडक वास्तुशास्त्र

१) पती-पत्नीने डबल बेडवर वेगवेगळ्या गाद्यावर झोपू नये.
२) दरवाज्यासमोर कधीही झोपू नये.
३) कपाटे दक्षिणेच्या भिंतीला चिकटवून ठेवून ती उत्तरेस उघडतील अशा बेताने मांडावीत.
४) झोपण्याच्या खोलीत माशांचे शोकेस ठेवू नये.
५) झाडून घेतल्यावर झाडू घरात लपवून ठेवावा.
६) संपूर्ण कुटुंबाचा हसतमुख फोटो घरात आवर्जून लावावा.
७) वास्तु सौख्याच्या दृष्टीने कुटुंबीयांनी दररोज एकत्र बसूनच जेवण करणे चांगले.
८) शौचालयाचे दार नेहमी बंद ठेवावे.
९) बंद घड्याळे किंवा उपकरणे घरात ठेवू नयेत.
१०) घराच्या उत्तर दिशेस धातुचे कासव ठेवावे.
११) घरात दररोज अगर बत्त्या, धुपदीप कापुर जाळावा.

घरच्या मसाल्यांचा आजारात उपयोग

हळदी:- १) हळदीचे मुख्य कार्य रक्त व त्वचेवर होत असल्याने शरीरातील रक्त शुद्धीसाठी विविध त्वचा विकारांवर सुज, लाली असताना वापरतात.
२) मधुमेह, रक्तपित्त यात हळदीचा वापर केला जातो.
३) मधात मिसळून हळदीचे चुर्ण कानात घातल्याने कानातील स्त्राव व ठणका दूर होतो.
४) आवळा, निंब व हळदीचा काढा घेतल्यास खरूज नष्ट होते.
जिरे:- १) वारंवार तोंड येण्याची प्रवृत्ती असल्यास व गिळताना त्रास होत असल्यास जि-याचे चुर्ण खडीसाखरे  बरोबर चघळावे.
        २) स्तनाच्या वृद्धीसाठी गुळ व जि-याचे चुर्ण एकत्रितपणे घ्यावे.
मोहरी:- मोहरी उष्ण असल्याने स्वंयपाकात तिचा वापर बेताने करावा. मोहरीमुळे वारंवार होणारा कफ, सर्दी. खोकला यांचा नाश होऊन भूक वाढण्यास मदत मिळते.
लवंग:- १) विविध प्रकारच्या सर्दीमध्ये लवंग चुर्ण व मध हे मिश्रण घ्यावे.
           २) खोकल्यातून कफ पडत असताना लवंग भाजून मधाबरोबर घ्यावे.
          ३) दात दुखत असताना लवंग चावून दुखणाऱ्या दाताखाली दाबून धरावी. त्यामुळे वेदना कमी होतात.
वेलदोडा:- १) जुनाट खोकला व् दम्याच्या आजारात वेलची चुर्ण दिल्यास उपयोग होतो.
              २) आवाज बसणे, घश्याचे विविध आजार यात वेलची चुर्ण ५०० मि.ग्रॅम व खडिसाखर २०० मि. ग्रॅम   सकाळ व संध्याकाळ घ्यावे.
             ३) वेलची चुर्ण व सुंठ एकत्रित घेतल्यास पचन व्यवस्थित होऊन भूक लागण्यास मदत मिळते.
             ४) विविध प्रकारच्या कफ विकारावर वेलची चुर्ण हे रामबाण औषध आहे.
दालचीनी:- १) हिरड्यांना मजबुती येण्यासाठी दालचीनीचा तुकडा व विविध रोगावर दालचीनी हे उत्तम औषध   आहे.
                 २) दंतावर कृमि व वेदना असताना दालचीनी तेलाचा बोळा दातांमध्ये ठेवावा.
आले:- १) आल्याचा वापर आपण अनेक पदार्थात करतो. मळमळणे, छातीत जळजळणे, पोटदुखी यासारख्या विकारावर आल्याचा रस घेवून पाहा. सकाळी आल्याचा तुकडा घालून घ्या. मळमळण्याच्या  विकारांपासून मुक्त व्हा. 
          २) कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात आणण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. 
          ३) आल्यामुळे अन्नपचनाला मदत होते. आल्यातील घटक आपल्या शरीरातील पाचकरसाशी मिळते   जुळते असतात. यामुळे प्रथिनयुक्त जड पदार्थ ही सहजरीत्या पचतात.
          ४) आल्याचा तुकडा दातात धरल्यास दात दुखणेही थांबते.
          ५) सर्दी व तापावर आल्याचा रस लाभदायक ठरतो. असा रस एक चमचा आल्याचा रस, लिंबाचा रस व   मध गरम पाण्यात घालून बनवला जातो. यामुळे गच्च झालेले नाक मोकळे होते. तसेच यकृतालाही चालना मिळते.

स्मरणशक्ती वाढविण्यास बदाम

एक साधा सोपा उपाय देत आहोत. ज्याने बौद्धिक क्षमता वाढून स्मरणशक्ती तीक्ष्ण बनण्यास नक्कीच मदत मिळेल.
उपाय:- रात्री एक कप पाण्यात गोड कागदी बदाम भिजत ठेवा. सकाळच्या वेळी हे बदाम सोलुन खुप चावून  चावून खा. त्यावर गोड गरम दुध अवश्य प्या. या प्रयोगाचा सतत दहा दिवस चढत्या क्रमाने व पुढील दहा दिवस उतरत्या क्रमाने प्रयोग करावयाचा आहे. दररोज एक - एक बदाम वाढवत न्यावा. जसे पहिल्या दिवशी एक दुस-या दिवशी दोन तिस-या दिवशी तीन वगैरे दहा दिवसानंतर हाच क्रम उतरता करावा. म्हणजेच एक एक बदाम कमी करत एक वर यावे. अशा प्रकारे हा २० दिवसांचा प्रयोग करा व नंतर आपल्या स्मरणशक्तीची चाचणी घेवून पाहा.
१) दुध व तीळ रोज सकाळी घेतल्याने बुद्धी सुधारते.
२) अनुशा पोटी रोज दोन चमचे मध गरम पाण्याबरोबर घेतल्यास स्मरणशक्तीची वाढ होते.
3) जांभळाचा रस, मध व आवळयाचा रस, गुलाब फुलाचा रस सम प्रमाणात घेतल्यास रक्त व स्मरणशक्ती वाढते.
४) दररोज सकाळी बदामाचा हलवा खावून त्यावर दुध प्यावे. म्हणजे स्मरणशक्ती प्रखर बनते.
५) बदामाच्या तेलाने मालीश केल्याने ( डोक्याला ) मेंदु तरतरीत राहतो व स्मरणशक्ती प्रखर बनते.
६) बदामाचा खरा उपयोग शारीरिक बल वाढविणे आणि स्मरणशक्ती प्रखर बनविणे हे आहे.
७) शक्तीची आणि बुद्धीची कामे करणाऱ्या लोकांच्या खुराकात बदामाचा हमखास समावेश करावा.

स्मरणशक्तीची चाचणी कशी घ्यावी?

१ ते १० पैकी कोणताही एक पाढा सरळ म्हणावा. व नंतर थोडया वेळाने तो पुन्हा उलट म्हणण्याचा प्रयत्न करावा. जितके आकडे बरोबर येतील तो आपला बुद्ध्यांक सूचित करतो.

शरीर शुद्धी🔴🔴

रोज आदल्या रात्री पाण्यात भिजवलेले ३ ते ५ बदाम सोलून सकाळी खावेत. त्याबरोबरच पंचामृत म्हणजे (एक चमचा साखर एक चमचा मध, एक चमचा दही दोन चमचे तुप व ४ ते ५ चमचे दुध या क्रमाने पाच ही गोष्टींचे मिश्रण ) सकाळी नाष्टा करण्यापूर्वी घ्यावे. यातच केशरची पूड घालावी. असे हे पंचामृत अमृताप्रमाणे गुकारी असून शरीरशक्ती, बुद्धी, स्मृती, मेधा कांतिवर्धक असून शुक्र वर्धनास सर्व दृष्टीने प्रशस्त आहे. रोजच्या जेवणात तुप फक्त अन्नशुद्धी पुरते दोन थेंब न वापरता शुक्रवृद्धी करता दोन चमचे वापरावे.
🔴🔴
पोटाचे विकार 

१) कृश व्यक्तीनी रोज सकाळी तीळ चावून खावेत व तिळाच्या तेलाने अभ्यंग करावे नंतर गाईचे दुध   प्याल्यास शरीर धष्ठपुष्ठ होते.
२) पक्षाघात किंवा अर्धांगवायु सारख्या विकारात तीळ तेलावर विविध संस्कार करून अभ्यंग व मर्दनास ही   उपयोगात आणतात.
३) रोज रात्री झोपताना १ चमचा तिळ चावून वर गरम पाणी पिण्यास देणे यामुळे रात्री अंथरुणात लघवी होत   नाही. 
४) जेवणानंतर नियमित संत्री खाल्ल्यास पोटाचा जडपणा, अपचन गॅस यापासून मुक्तता मिळते. 
५)  कोणत्याही प्रकारच्या जखमा होऊन पू झाल्यास मध लावावा. जखमा लवकर बऱ्या होतात.
६) थोडासा ओवा किंवा ओव्याचा काढा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, व्यवस्थित होते.
७) एक चमचा लिंबाचा रस व चिमूटभर खाण्याचा सोडा पेलाभर पाण्यातून घेतल्यास पाचन नीट होते.
८) रात्री झोप लागल्यावर मध्ये जाग येते तेव्हा एक ग्लास पाणी पिवून पुनः झोपल्यास सकाळी मलविसर्जन चांगले होते.
९) आवळयाची पूड मध घालून खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होईल.
१०) पिण्याच्या पाण्यात गुलाबाचे फुल टाकून १० ते १५ मिनिटांनी पाणी प्यायल्याने उत्साह निर्माण होतो.
११) पोटाच्या विकारासाठी गुलकंदाचे सेवन उत्तम औषध आहे.
१२) तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी सकाळी उठून प्याल्यामुळे कफ आणि खोकला कमी होतो. स्थूल  व्यक्ती कृश होउ शकते.
१३) रोज जेवण झाल्यावर थोडासा गुळ खावा त्यामुळे अपचन होत नाही.
१४) भूक लागण्यासाठी काकडीच्या गोल कापावर ( तुकडयावर ) पुदिन्याची पाने, लिंबाचा रस व काळे मीठ             घालून खाल्ल्यास यकृताचे कार्य सुधारते. व भरपूर भूक लागते.
१५) ओवा हातावर चोळून तोंडात टाका व वर गरम पाणी प्या. पोटदुखी, मुरड व गॅस विकारात आराम मिळतो. १६) एक ग्लास संत्र्याच्या रसात एक चिमुट काळे मीठ व थोडी काळ्या मि-याची पूड घालून प्यायल्यास लगेच         लाभ मिळतो. जूनाट अजीर्ण असल्यास कही दिवस उपाय नियमित करावा.
१७) अनसेपोटी संत्र्याचा रस थोड़े मीठ घालून घेतल्यास जुनाट बद्धकोष्ठ ही दूर होतो.
१८) पोट दुखत असेल तर संत्र्याच्या रसात थोडा हिंग मिसळा.
१९) गुलाबाच्या पाकळ्या दुधात उकळून या दुधाचे नियमित सेवन करा. बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो.
१) पाय-या चढणं हा चांगला व्यायाम आहे. शक्यतो लिफ्टचा वापर टाळावा.
२) एक तास शांत बसलं तरी ही ९० ते १०० कॅलरी खर्च होतात.
३) कोणत्याही प्रकारचे धुम्रपान, विडी,सिगारेट, पाईप हे आरोग्याला धोकादायक असते आणि आयुष्य कमी करते.
४) कधीही घाईमुळे किंवा वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाष्टा टाळू नका. नाष्टा निट करा,वाटल्यास रात्रीचे जेवण हलके घ्या.
५) मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान हा एक उत्तम मार्ग आहे.
६) मानसिक तणावामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते.आम्लाचे प्रमाण वाढल्यामुळे जळजळ होणं, आंबट पाणी येणं, मळमळ पोटदुखी असा त्रास होतो.
७) टेनिस खेळणं हा पळण किंवा पोहणं यासारखा उत्तम व्यायाम आहे. आणि यामुळे एक मिनिटांत आठ ते दहा उष्मांक खर्च होतात.
८) प्राणी ( कुत्री, मांजरी, मासे ) पाळणे हे ( मालकाच्या ) मनाला शांती देते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
९) एका साधारण शीतपेयाच्या बाटलीत सुमारे दीडशे उष्मांक ( दीड चपाती इतके ) असतात. आपण ब-याचदा विनाकारण मित्रांबरोबर किंवा जेवणाबरोबर शीतपेय घेत असतो नाही का?

त्वचा 

 १) अंगाला वास येत असल्यास बेलाच्या पानांची पेस्ट करून १० मिनिटे चोळून लावावी. नंतर धुवून टाकावी.
 २) त्वचा कोरडी असल्यास कच्चे दुध, ग्लिसरीन, लिंबू रस एकत्र करून लावावे.
 ३) कडु लिंबाचा रस, हळद, तुळशीचा रस लावावा. जंतु संसर्ग होत नाही.
 ४) त्वचेच्या टोनिंगसाठी एक कप गरम पाण्यात १५ ते २० पुदिन्याची पाने अर्धा तास भिजवून ते पाणी
     चेह-यास लावावे.   
५)अननस सेवन केल्यास सर्दी थांबते.गायीच्या दुधात थोडी हळद, कही थेंब तुप व वेलदोडयाची पूड आणि  चवीसाठी साखर घालून उखळून प्यावे.
६)आठ ते दहा बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी अनुसेपोटी बदाम खावून एक ग्लास दुध प्यावे. शरीराला व डोळ्यांना खूप लाभदायक आहे.
७) बिटाच्या नित्य सेवनाने रक्तातील लोहचे प्रमाण वाढवून हिमोग्लोबीन या रक्तातील प्रमुख घटक द्रव्याचे  कार्य चांगले होते.
८) खोबऱ्याचे तेल व लिंबाचा रस यांच्या मिश्रणाने शरीराला मालीश केल्यास त्वचा नरम मुलायम होईल. तसेच त्वचेचे किरकोळ विकारही बारे होतील. 
९) थोड़ी विडयाची पाने व थोडी तुळसीची पाने यांचा एकत्र रस काढून ती मधात मिसळून खाल्ल्यास सर्दी कमी  होते.
१०) बदामाचा गर बारीक वाटून त्यात थोड़े पाणी टाकावे. आणि त्याचे चाटणे रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने कफ विकारात आराम वाटू लागतो. आणि खोकलाही दूर होतो. 
११) दुधात हळद, मीठ व गुळ घालून गरम प्यायल्यास खोकल्यास आराम मिळतो.
१२) तुळशीच्या खोडाचे तुकडे चघळून खाल्ल्यास फुफुसाच्या विकारात आराम मिळतो.
१३) तुळशीचा रस चेहऱ्याला लावल्यास त्वचा कांतिमान होते.
१४) दुध तापवायच्या आधी थोडेसे हातावर घेवून चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांत चेहरा धुवून टाका. याने  त्वचा स्वच्छ होते.
१५) सफरचंदाच्या रसामध्ये गुलाब पाण्याचे तीन  चार थेंब मिसळून चेहऱ्यावर लावा चेहरा उजळतो.
१६) सफरचंदाचे तुकडे त्वचेवर घासून पंधरा मिनिटानंतर चेहरा धुवा.
१७) काकडीच्या रसात लिंबाच्या रसाचे दोन थेंब मिसळून लावा. 

Thursday, 28 January 2016

Book Review - Ramayana – The Game of Life : Stolen HopeName of Book : Ramayana – The Game of Life : Stolen Hope
The Author: Shubha Vilas
Year of release : 2106
Published by :Jaico Publishing House
No. of Pages:312
Cover: Paperback
Genre: Mythological / Epic
Book Price: Rs. 299
Copy: Blogadd Review Copy
 

The wealth of knowledge that lies within our ancient Indian scriptures is unparalleled in the world. The Ramayana and Mahabharata are epics in their own right, and we’re sure that there are answers to any moral, social, political and even spiritual questions that you might have hidden in their pages. All of us can learn a lot to learn from these books, but lack of time and will power to flip through such huge tomes are obstacles in our way. To remedy this, Author Subha Vilas has presented the third volume of the ‘Ramayana – The Game Of Life’ series for us.

About the Author:
Shubha Vilas, a spiritual seeker and a motivational speaker, holds a degree in engineering and law with specialization in Patent Law. His leadership seminars are popular with top-level management in corporate houses. He also helps individuals deal with modern-life situations by applying the teachings of the Bhagavad Gita, Ramayana and other dharmic traditions

About the Book:
In the evil labyrinths of Dandakaranya forest, human values are put to test. Rama’s righteousness, Lakshmana’s loyalty and Sita’s endurance reflect our own sense of values and judgment in difficult times. The story unfolds the facets of human life – the conflict and trickery, the praise, the slander and above all, the hope and the despair in the eventful forest life of exiled royals.

Stolen Hope is about extreme deception and extreme love. It is about arrogant power and deep devotion. With every twist and turn, Rama, Sita and Lakshmana find themselves robbed of whatever and whoever they valued the most.

Exploring the dynamics of human relations – between father and son, husband and wife, teacher and disciple – and the complex game of power and greed, Stolen Hope mirrors our own dilemmas in the modern world and teaches us how we must overcome them.

About the Story:
Ramayana – The Game of Life : Stolen Hope, is an account of thirteen years of Rama’s exile along with Sita and Laxmana who accompanied him in the arduous mission. This time, the story starts with King Danda violating the modesty of Shukracharya’s daughter Araja and thus cursing of Shukracharya that his kingdom would turn into a place of animal-like humans and will become home to the jungle humans ever known. Due to the curse, within some time the kingdom becomes jungle known as ‘Dandakaranya’.  

The story then moves with how Rama, Sita & Lakshmana wander the forests relocating to Dandakaranya forests, where they learn many things meeting sages and relieving people from curses, etc., A storm hits the story when Shurpanakha falls in love with Rama when she sees him.  

The story then deals with the abduction of Sita. And finally ends with Lord Rama meeting Shabri who hands over a map to the duo to find the wonder monkeys in the Kinkishdha forest for assisting them in rescuing Sita.

Opinion:
We all have heard or rather read about the story of Ramayana  however, what makes this book different from others is the extreme detailing and the interpretation of acts which contributes to the development of our own perspective about the Ramayana.

The main USP of this book according to me are the footnotes. The author has added footnotes on the take-aways and learning that can be imbibed from this epic. The author has also done the great job by providing the summary of the past two books in the inception of the Book 3 which makes the readers to read and follow the story easily.

After completing the reading of this series,  I am eagerly waiting for the next (4th) part where Rama will meet Hanuman and Sugriva. The trailer of part 4 sparks the curiosity of readers..

Final Word
I will strongly recommend this book to everyone who loves epics.


This review is a part of the biggest Book Review Program for Indian Bloggers. Participate now to get free books!