Thursday, 12 February 2015

...अनावश्यक चरबी कमी करा... शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय.

 साहित्य : -
१०० ग्राम मेथी,
४० ग्राम ओवा,
२० ग्राम काळे जीरे
हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे....


 कृती :
वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात  (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून
घ्याव्यात.  नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी.

रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

 हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यातसाचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते.

तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात.
सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

 फायदे :

 ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो....

 ०२) हाडे मजबूत होतात....

 ०३) काम करण्यास स्फूर्ती येते....

 ०४) डोळे तेजस्वी होतात....

 ०५) केसांची वाढ होते....

 ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.....

 ०७) रक्ताभिसरण चांगले होते....

 ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो....

 ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते....

 १०) बहिरेपणा दूर होतो....

 ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.....

 १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो....

 १३) दात बळकट होतात त्यावरील इनॅमल टिकून राहते....

 १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात....

 १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते....

 १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते....

 १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा . रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते...

 १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते....

 १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते....

 २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात...

 २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते.  हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते...

 २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते..

 २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर....

No comments:

Post a Comment